– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
नागपूर :- दिनांक २२/०२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ अवैध चंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन अरोली येथील निमखेड़ा बाजार चौक येथे काही इसम ५२ ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावुन जुगाराचा खेळ खेळत आहे. अशी गोपनिय माहीती पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफला प्राप्त झाली वरून सदर स्टाफ यांनी निमखेडा बाजार चौक येथे जावुन पाहणी केली असता त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसली. तेथे पोलीसांना पाहुन काही लोक पळु लागले, त्यांना स्टाफच्या मदतीने पकडण्यात आले. सदर ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे- १) देवानंद हरीचंद्र वाढवे वय ४६ वर्ष रा. निमखेडा २) संदिप दामाजी राणे वय ४६ वर्ष रा. ओडी टोला सडक अर्जुनी जि गोंदिया ३) सुभाष कवडू खंगार वय ३४ वर्ष रा. निमखेडा ४) राजकूमार भैयालाल नागपूरे वय ४५ वर्ष रा. मोगरा जि गोंदिया ह.मू. निमखेडा ता मौदा है पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण ०४ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) ५२ तासपत्ते व नगदी ३८००/- रू. २) एकूण ०४ मोबाईल किंमती २३०००/- रू. असा एकूण २६८००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूध्द पोलीस ठाणे अरोली येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून नमुद आरोपीतांना सुचनापत्रावर सोडण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अरोली येथील ठाणेदार सपोनि, निशांत फुलेकर पोलीस हवालदार संदीप बाजनघाटे, शाम पोकळे, होमगार्ड निलेश कावळे, अंगत गयगये यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.