अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद वाहनासह एकूण ४५,९९,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १२ चक्का ट्रक क्र. एम. एच. ४०/ सि डि ३९२८ चा चालक गाडी मध्ये अवैध्यरित्या विनापरवाना रेती लोड करुन वाहुतक करीत आहे, अशा खात्रीशीर बातमी वरून मौजा रामटेक येथे नाकाबंदी करून आरोपी नामे टिकाराम उर्फे संतोश लेहाराम नागवंशी वय ३६ वर्ष रा. वार्ड क्र. ०१ पिपडखुडा त. क्रूड जि. अमरावती हे व ट्रक क्र. एम. एच. सि क्यु १८०४ चा चालक राजेश प्रल्हाद धुळे वय ३७ वर्ष रा. हनंतखेड वार्ड क ०३ ता अचलपुर जि, अमरावती हे दोन्ही मालकाचे सांगण्यावरून तुमसर रोडने नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना रेती वाहतूक करतांनी मिळून आल्याने आरोपींच्या ताब्यातून १२ चक्का ट्रक क्र. एम एच ४० सि डि ३९२८ किंमती २०,००,०००/- रु व अंदाजे १५ ग्रास रेती ३,०००/- रू प्रती ग्रास प्रमाणे ४५,०००/- रू असा एकूण २०,४५,०००/- रू चा माल व १४ चक्का ट्रक क्र. एम एच सि क्यू १८०४ किंमती २५,००,०००/- व अंदाजे १८ ब्रास रेती ३,०००/- रू प्रती ब्रास प्रमाणे ५४,०००/- रु. असा एकुण २५,५४,०००/- रू असा दोन्ही गाडी व मालाचे किंमती असा एकुण ४५,९९,०००/- रू. चा मुद्देमाल अवैदयरित्या विनापरवाना मालकाचा सांगण्यावरून वाहतुक करीत असतांनी मिळुण आल्याने आरोपी नामे-१) राजेश प्रल्हाद धुळे वय ३७ वर्ष रा. हनंतखेड वार्ड क्र. ०३ ता. अचलपुर जि. अमरावती २) संतोष लेहाराम नागवंशी वय ३६ वर्ष, रा. वार्ड क्र.०१ पिपडखुडा त. वरूड जि. अमरावती ३) कुणाल नामदेवराव रा. जरूड ता वरूड जि अमरावती ४) शेख फैयाज शेख निसार, रा. जरूड ता. वरूड जि. अमरावती यांचेविरुद्ध पोस्टे रामटेक येथे अप क्र. १२५/२४ कलम ३७९, १०९ भादंवि, सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम ४, २१ खाण, खनिज अधि. ३ सार्वजनिक मालमत्ता दस्तऐवज अन्वये पो. स्टे. रामटेक येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे रामटेक येथील ठाणेदार प्रशांत काळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोलीस हवालदार अमोल इंगोले, पोलीस नायक प्रफुल रंधई, मंगेश सोनटक्के, पोलीस अंमलदार शरद गिते, धिरज खते यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती (गौणखनिज) ची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Sat Feb 24 , 2024
खापा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पी.स्टे. खापा हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, एक इसम वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ ट्रॅक्टर संलग्न टाली मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमी वरून वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ नाकाबंदी करीत असताना एक अवैध रेती वाहतुक संबंधाने जॉन डियर ५२०४ कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच-४०/एल- ४२३७ व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com