नागपूर :- दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी नागपूर महानगर पालिका शिक्षक संघाच्या अध् यापक भवन येथे वार्षिक अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक दिन उत्साहात पार पडला.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, राजेन्द्र सुके, किर्ती गणविर, विलय वालदे प्रमुख अतिथी होते.
मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन अधिका-यांना देवून प्रास्तविकात मनपा शिक्षकांच्या प्रश्नांचा उहापोह केला. याप्रसंगी 70 गुणवंत विद्यार्थी तसेच 134 सेवानिवृत्त शिक्षक व 12 आदर्श शिक्षकांचा गौरवपर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलीत. शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी याप्रसंगी शिक्षकांच्या प्रश्नांची दखल घेत सोडविण्याचे आश्वासन देत त्याचवेळी विद्याथ्यांच्या गुणवत्तेचा विकास करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या प्रार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी कार्यक्रमाची दखल घेवून काल शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेकरीता बोलाविले व मागण्यांची पुर्तता करण्याविषयी शिष्टमंडळाला आश्वस्त करत मा. आयुक्तांना निर्देश दिले हे येथे उल्लेखनिय.
कार्यक्रमास मनपाचे बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. कार्यकमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. मनपाच्या सांस्कृतिक कला मंचच्या शुभांगी पोहरे, अंजली कावळे, मंजुषा फुलंबरकर, आशा मडावी, कहकशा यांनी स्वागत गीत व गीते सादर केलीत.
नरेन्द्र बारई हे कलाशिक्षक महाराष्ट्र कलाध्यापक मंडळाचे राज्याध्यक्ष तसेच शेखर वानस्कर महाराष्ट्र कलाध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वसुधा वैद्य व कृष्णा उजवणे यांनी केले तर सनद वाचन नुसरत खालीद यांनी केले.
कार्यकमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे प्रमुख सचिव देवराव मांडवकर यांनी केले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी शेखर वानस्कर, प्रफुल्ल चरडे, विनायक कुथे, दिपक सातपुते, परविन सिध्दीकी, गजानन सेलोरे, रामराव बावणे, महिला प्रमुख कल्पना महल्ले राकेश दुम्पलवार, तेंजूषा नाखले, गिता विष्णू, नुतन चोपडे, विकास कामडी, काजी नुरुल लतीफ, मलका अली, माया गेडाम, मनोज बारसागडे, सैयद हसन अली, प्रमोद खोबे व कार्यकारी मंडळ यांनी विषेश परिश्रम घेतले.