आझाद चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत वाहतूक प्रतिबंधित

– १४ नोव्हेंबर पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे आझाद चौक ते लाकडीपूल व मनिपूरा चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता आझाद चौक ते लाकडीपूल व मनिपूरा चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. हे आदेश येत्या १४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे. आझाद चौक ते लाकडीपूल व मनिपूरा चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजू दरम्यान रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. आझाद चौक ते लाकडीपूल पर्यंत रस्त्याचे वाहतूक बंद केल्यानंतर वाहतुकीचे दळणवळण दारोडकर चौक ते लाकडीपुल व मनिपुरा चौक ते लाकडीपुल आयचित मंदिर पर्यंत रस्त्यांचे वाहतुकीचे दळणवळण बंद केल्यानंतर वाहतुक आयचित मंदिर ते झेंडा चौक आणि झेंडा चौक ते गंगाबाई घाट रोड कडे वळवण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा वाहतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण, १ लक्ष ५१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस अमित गोनाडे ग्रुपला

Fri May 26 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव भाग २ आयोजीत करण्यात आले होते, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २५ मे रोजी मनपा सभागृहात पार पडला.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते विजेत्यांना धनादेश वाटप करण्यात आले.      चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग या स्पर्धा यात घेण्यात आल्या होत्या.या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights