कन्हान, कांद्री शहरात बुद्ध अस्तीचे भव्य स्वागत व दर्शन घेतले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– भव्य धम्म रैली काढुन नागरिकांनी दर्शन करित अभिवादन केले 

कन्हान :- कांद्री कन्हान शहरात भगवान बुद्ध , भदन्त सारीपुत्त, भदन्त माहामोगलॅन, भदन्त महेंद्र यांचे अस्ती कलशाचे आमगन होताच नागरिकांनी फुलांच्या वर्षावाने स्वागत करून, पुष्प अर्पित करित दर्शन घेत अभिवादन केले.

रविवार (दि.१७) मार्च ला सकाळी १० वाजता बोधिसत्व बौद्ध विहार कांद्री येथे बुद्ध अस्तीचे आगमन झाले असता नागरिकांनी पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित भदन्त ज्ञान ज्योति भन्तेजी, भन्ते धम्मपाल महाथेरो, धम्मसुगध भन्तेजी, माताजी कुंडलिका, कल्याणमित्र भन्तेजी, रुपानंदा माताजी सह आदी मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बोधिसत्व बौद्ध विहार कांद्री येथुन बुद्ध अस्तीची भव्य धम्म रैली काढण्यात आली.

ही रैली गांधी चौक कांद्री येथे पोहचली असता वार्ड क्र.१ येथी ल बौद्ध उपासक आणि उपासिका द्वारे फुलांच्या वर्षा व, शरबत, फळ वितरण करुन स्वागत करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने संताजी नगर येथे पोहचली असता भुमिपुत्र युवा सा. बहुद्देशीय संस्था द्वारे फुलांच्या वर्षाव आणि पाण्याची बाडल वितरित करुन स्वा गत करण्यात आले. समता सैनिक बुद्ध बिहार सात नंबर नाका येथे बौद्ध उपासक आणि उपासिकांनी रैलीचे फुलांच्या वर्षाने स्वागत करुन बुद्ध अस्तीचे दर्शन घेतले. तारसा चौक होत रैलीचे आंंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन समापन करण्यात आले. भदन्त ग्यान ज्योती महाथेरो यांचा धम्म प्रवचना नंतर अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकासात भेदभाव नाही! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Mar 18 , 2024
– मध्य नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन नागपूर :- गरिबांना घरे, तरुणांना रोजगार, रुग्णांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देणे हेच आपले धोरण राहिले आहे. चांगले मार्केट, पार्किंगची उत्तम सुविधा, उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आपण राबवित आहोत. शहरातील प्रत्येक घटकाचे कल्याण करण्यासाठी कामे केलीत आणि भविष्यातही करणार आहे. कधीही जात-पात धर्माचा विचार केला नाही आणि करणार नाही. विकासात कधीही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com