देवलापार :- अंतर्गत मौजा पोलीस स्टेशन देवलापार समोर हायवे क्र. ४४ समोर दिनांक ०८/१०/२०२३ चे ०७.३० वा. ते ०८.२५ वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली. की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी केली असता आरोपी चालक १) शेख नदीम अहमद कुरेशी, वय ३७ वर्ष याने आपल्या साथीदार २) विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेसह आपल्या ताब्यातील ६ चक्का आयसर क्र. CG 08 AT 8086 या वाहनामध्ये गोवंश जनावरांना अत्यंत कुर व निर्दयतेने वाहनात कोंबुन आखुड दोरीने पाय व तोंड दाबुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुरे जागेत कोंबुन कतलीसाठी अवैधरित्या वाहतुक करूण घेवुन जातांनी मिळुन आल्याने त्या गाडीतील जनावरांची पाहणी केली असता गांडी मध्ये १) ०९ नग काळे रंगाचे गोवंश बैल प्रत्येकी किंमती १५,०००/- रू प्रमाणे एकुण किंमती २,३५,०००/-रू (२) २० नग पांढरे रंगाचे गोवशं बैल प्रत्येकि किंमती १०,०००/- प्रमाणे एकुण किंमती २,००,०००/- एकूण ३,५०,०००/- रू चे गोवंश जनावरे दिसल्याने सदर गोवंश जनावरे हे चक्का आयसर क्र. CG 08 AT 8086 किंमती १०,००,०००/- व यातील एकूण २९ नग जिवंत गोवंश जनावरे किंमती ३,३५,०००/-रु असा एकूण १३,३५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी पोशी २३३९ सचिन भगवान येडकर पोस्टे देवलापार यांचे रिपोर्टवरून पो. स्टे. देवलापार येथे वरील आरोपीविरुध्द कलम २७९, ३४ भादंवी सहकलम ११ (१) (घ) (ड) (च) प्राणि निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० सहकलम ५ (अ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सह के ११९ सहकलम ४/१२२, १८४, ३/१८१, ११९, १७७ मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक राहुल रंगारी व नं. २०१९ पोस्टे देवलापार हे करीत आहेत.