स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.7) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत नाईक ले-आऊट, गोपालनगर येथील M/s Momo G यांच्याविरुध्द रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.31, रेशिमबाग चौक येथील निखीलेश बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.35, नरेन्द्रनगर येथील गुरुकृपा कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हायड्रोजन इंधनावर धावणार देशातील पहिली ट्रेन

Wed Feb 8 , 2023
– पाण्यातून हायड्रोजन काढून इंधनात रूपांतर – भारतीय रेल्वेत वैज्ञानिक क्रांती – कालका-सिमला नॅरोगेज मार्गावर धावणार नागपूर :-भारतीय रेल्वेने बरीच प्रगती केली. सुरुवातीला वाफेवर चालणारे इंजिन डिझेलवर चालू लागले. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यानंतर सध्या विजेवर रेल्वे गाड्या चालत आहेत. आता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने क्रांती केल्यानंतर चक्क हायड्रोजनवर रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. म्हणजे पाण्यातून हायड्रोजन वेगळे करून त्याचा इंधन म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com