प्रतिबंधीत तंबाखु विक्री करीता वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- दिनांक ३१.०१.२०२४ चे १७.४० वा. ते २०.३० वा. चे दरम्यान गुन्हेशाखा युनिट क. ५ पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत, पेट्रोलीग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून छापरू नगर चौक, येथे एक चार चाकी इट्टा वाहन क. एम.एच ४९ बी ब्रेड ००८२ थांबवून पंचा समक्ष चेक केली असता आरोपी क. १) लोकेश ज्ञानेश्वर मोहुर्ले यय २६ वर्ष रा. प्लॉट नं. १. गुलशन नगर, कळमणा नागपूर २) सागर मनोज गौर वय २३ वर्ष रा. बजेरीया चौक, गणेशपेठ नागपूर यांचे ताब्यातुन शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व तांबाखुजन्य पदार्थ व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखुचा साठा किमती अंदाजे ७,०७,१००/- रू चा मिळुन आल्याने आरोपीचे ताव्यातुन सुगधीत तंबाखु व गुन्हयात वापरलेले वाहन किमती अंदाजे ६,००,०००/- रु असा एकुण १३,०७,१००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाबाबत आरोपीस सखोल विचारपूस केली असता आरोपीनी नमुद मुद्देमाल पाहिजे आरोपी क. ३) आदित्य गौर वय ३० वर्ष रा. हंसापुरी खदान नागपूर ४) जैन नावाचा इसम यांचा असल्याचे सांगीतले याप्रकरणी पोउपनि आशिष कोहळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे लकडगंज येथे आरोपीविरुध्द कलम १८८, २७२, २७३, ३२८ भा.दं.वी सहकलम ४९ अन्न व सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ व २ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि राहुल शिरे, पोउपनि आशिष कोहळे, पोहवा महादेव थोटे, रामचंद्र कारेमोरे रामनरेश यादव, टष्णुलाल चुटे, नापोअ. निखील जामगडे, अमोल भक्ते, सुधिर तिवारी यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Sat Feb 3 , 2024
नागपूर :- फिर्यादी अजहर अहमद शेख, वय ४४ वर्षे, रा. वार्ड नं. १५ रजनीबाई शाळेजवळ, महादेवपुरा, वर्षा ह.मु. महीला माळा, ऑरेंजसिटी टॉवर, पत्रकार भवन रोड, धंतोली, नागपुर यांचा लॅपटॉप विक्रीचा व्यवसाय असुन, त्यांचेकडे आरोपी बादल अन्नाजी वाघ, वय २० वर्षे, रा. सरस्वती नगर, तकीया, धंतोली हा नौकर म्हणून काम करीत असे. दिनांक १७.०९.२०२३ चे ११.०० वा. ते दिनांक २८.०१.२०२४ चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com