नागपूर :- नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त भागामध्ये झालेल्या गंभीर आजारांपासून स्थानिक नागरिकांच्या स्वस्थ आरोग्यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीद्वारे नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, यांच्या नेतृत्वात सूदामपुरी वर्मा ले आउट या परिसरात आजपासून आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरात मुसळधार पावसाने पीडित रहिवास्यांना भाजप वैद्यकीय आघाडी व न्यू ऐरा हॉस्पिटल च्या डॉक्टर्स द्वारे मोफत वैद्यकीय मार्गदर्शन, औषधी वाटप, नेत्र तपासणी, डायग्नो प्लस द्वारे रक्त तपासणी आदी आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या भागात आज भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात शहर महामंत्री अश्विनी जिचकार, भाजप पच्छीम मंडळ अध्यक्ष विनोद कान्हेरे, दक्षिण पच्छिम अध्यक्ष रितेश गावंडे , नगरसेविका परिणिता फुके आणि स्थानिक भाजप पदाधिकारी यांचे सहकार्याने शिबिर आयोजित होत असून भाजप वैद्यकीय आघाडी द्वारे डॉ गिरीश चर्डे, डॉ श्रीरंग वराडपांडे ,डॉ रोहित राखुंडे, डॉ अंकित भांगे, राकेश कोणतंवर, डॉ सारंगपुरे, डॉ रामेश्वर, आणि वैद्यकीय डॉक्टर्स टीम विशेष सेवा प्रदान करत आहेत. या आठवड्यात सूदामपुरी वर्मा ले आउट, पांढराबोडी, अंबाझरी, डागा ले आउट , सुरेंद्रगढ , नंदनवन झोपडपट्टी, अशा अनेक पूरग्रस्त भागात निःशुल्क आरोग्य शिबिरांचे आयोजन होणार आहेत.