नागपूर :-दिनांक ०८.०२.२०२३ से २०:०० वा ते दिनांक ०९.०२.२०२३ चे ०८:३० या दरम्यान पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट न. २९ जमील सोसायटी मानकापूर येथे राहणारे फिर्यादी अमोन किशोर जयस्वाल वय ४० वर्ष हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख एकूण ६०,०००/- रू मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे कलम ४५४, ४५७, ३८० भा. दं. वी अन्वये गुन्हा नोंद होता.
मानकापूर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून गुन्हयाचे तपासात आरोपी १) सुजल उर्फ मिन्दु तिर्थराज साखरे वय १९ वर्ष रा. घर न.२५९ माता टेकडी, इवेरा २) श्रेयांश शैलेष पाटील वय १९ वर्ष रा. गल्ली न. ५ बाराखोली यांना खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपीने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने पोलीस ठाणे मानकापूर हदीतुन दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपिचे ताब्यातुन दोन मोटरसायकली व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किमती १,३०,००० /- रु चा मुझेमाल जप्त करून एकुण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. वरील कामगिरी राहुल मदने, पोउपआ, परी क. ०२. रोशन पंडीत सहा. पोलीस आयुक्त, सदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि शुभांगी वानखेडे, सपोनि विलास पाटील, सपोउपनि सुनिल डगवार, नापोअ विजय यादव, प्रविण भोयर, अनुप यादव, पोअ योगेश महाले, दिपक चव्हाण, विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.