पुढील पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

– नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:

• नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.

• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः

• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.

• कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, रात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

• ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात 8 ते 12 जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .

• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट

Sat Jun 8 , 2024
नवी दिल्ली :- 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com