डिजिटल माध्यमाने हिंदी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले – प्रा. डॉ. मोना चिमोटे

– आयआयएमसीत हिंदी पंधरवाडा निमित्य विविध कार्यक्रम

अमरावती :- डिजिटल माध्यमाने हिंदी भाषेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदी रोज नव्या आयामांना स्पर्श करीत आहे असे मत प्रा. (डॉ.) मोना चिमोटे यांनी आयआयएमसीत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले .

भारतीय जन संचार संस्थानच्या पश्चिम क्षेत्रीय परिसरातर्फे हिंदी भाषा दिनानिमित्य दिनांक १४ ते २९ दरम्यान हिंदी पंधरवाडा साजरा करण्यात येत असून यात विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचा एक भाग म्हणून मंगळवारी (दि २६) रोजी दुपारी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी आणि हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. (डॉ.) मोना चिमोटे यांनी ‘डिजिटल मीडियाच्या युगात हिंदी भाषेची आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थानचे क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती होते. यावेळी विचारमंचावर डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, डॉ. आशिष दुबे उपस्थित होते.  प्रा. चिमोटे पुढे म्हणाले की, डिजिटल माध्यमांच्या युगात हिंदी तसेच सर्व भारतीय भाषांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना ताकदीने सामोरे जाणेसाठी युवक आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. भाषेच्या समृद्धीमुळे डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात निर्माण संधींचा फायदा विद्यार्थी घेऊ शकतात. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. गेल्या काही वर्षांत ही संख्या 200 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे आपली मातृभाषा ही संगणकाची भाषा बनलेली नाही. हिंदीला महत्त्वाचे स्थान देण्यासाठी तरुणांनी दैनंदिन कामात हिंदीचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे असे ही त्या शेवटी म्हणाल्या.

प्रा. (डॉ.) वीरेंद्र कुमार भारती म्हणाले की, भाषा लोकांना जोडण्याचे काम करते त्यामुळे प्रसारमाध्यमात भाषा शुद्धतेला महत्व आहे. कल्पना, माहिती आणि ज्ञान देण्यासाठी माध्यमांमध्ये भाषेचा वापर केला जातो. माध्यम व्यावसायिक प्रभावी संवादासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. ही भाषा तांत्रिक असली तरी ती दैनंदिन वापरातील आहे त्यामुळे ती जनसामान्यांना जोडणारी ठरते. डिजिटल मीडियाच्या युगात हिंदी भाषेसमोरील प्रमुख आव्हानांचा उल्लेख करून ते म्हणाले की, डिजिटल मीडियाचे आगमन आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मुद्रित माध्यमांसमोर आव्हान उभे राहिले आहे. यासोबतच गोपनीयता, सोर्सिंग, हितसंबंधांचा संघर्ष, निःपक्षपातीपणा आणि सत्यता यासंबंधीची आव्हाने समोर आली आहेत. हिंदी आणि प्रादेशिक भाषांच्या डिजिटल स्वरूपाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. हिंदी वाचणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्क्यांनी वाढत आहे. तर इंग्रजीत हे प्रमाण १९ टक्के आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी संस्थेत हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रा. मोना चिमोटे आणि शिक्षकांनी केले. सुरुवातीला डॉ.राजेशसिंह कुशवाह यांनी विद्यार्थ्यांना राजभाषेची शपथ दिली. सूत्रसंचालन डॉ.आशिष दुबे यांनी तर आभार डॉ.राजेशसिंह कुशवाह यांनी मानले. डॉ.विनोद निताळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला हिंदी, मराठी आणि इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सैनिकांच्या वेतन व भत्यांविषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम आणि वेतन लेखा कार्यालय (अ श्रे) द गार्ड्स, कामठी कार्यालयाचा आढावा

Thu Sep 28 , 2023
नागपूर :- डॉ. राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी, प्रधान नियंत्रक रक्षा लेखा (दक्षिण कमांड), पुणे यांनी सैनिकांच्या वेतन व भत्यांविषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आणि वेतन लेखा कार्यालय (अ श्रे), द गार्ड्स, कामठी कार्यालयाचा व्यापक आढावा घेतला. 04 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत सैनिकांच्या वेतन व भत्यांविषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा आढावा उत्तम अनुभवी आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com