संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे.तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी मागील 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौक येथे कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने बेमुद्दत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले असून साखळी उपोषणाच्या 10 व्या दिवशी आज शिवसेना नेता पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी या साखळी उपोषण मंडपी आपली मौलिक उपस्थिती दर्शविली. दरम्यान या साखळी उपोषणाला 10 दिवस लोटूनही संबंधित प्रशासन यावर गंभीर्याची भूमिका घेत नाही यावर खेद व्यक्त केला.मात्र उपोषणकर्त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून न्यायिक लढ्यासाठी सुरू असलेल्या या साखळी उपोषणाला आमचा पाठींबा असल्याचे मत व्यक्त केले मागण्यांची पूर्तता होई पर्यंत लढा कायम असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी सुरेश साखरे, पुर्व विदर्भ संघटक, राधेश्याम हटवार, नागपूर जिल्हा संघटक, मुकेश यादव,शहर प्रमुख,सुंदरसिंग रावत,महेश तालेवार,सुरज दास, रितेश केझरकर,मनोज पाटील, आकाश टेंभुर्णे आदींनी उपस्थिती दर्शविली होती तसेच या उपोषणात सहभागी असलेले सुगत रामटेके, उमेश भोकरे,जितू गेडाम, संघपाल गौरखेडे, राजन बागडे, छोटू ढोके,गणेश आगाशे आदी उपस्थित होते.
हे साखळी उपोषण जयस्तंभ चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे पुनर्रचना करून सौंदर्यीकरण करणे,भूमिगत गटार योजनेतील आर्थिक अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावे,कामठी शहरातून गडप करण्यात आलेले औद्योगिक वसाहत ची पुनर्रचना करण्यात यावे,कामठींतील प्रस्तावित क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, कामठी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नविन बाजारपेठ राजश्री छत्रपती शाहू महाराज रविवार बाजार सुरू करण्यात यावा.नागपूर जिल्ह्यातील मंजूर वैद्यकीय महाविद्यालय कामठी शहरात प्रस्तावित करावा अथवा येथे 500खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय मंजूर करण्यात यावा कामठी शहरातील शासकीय जमिनीवर शासन प्रशासनामार्फत बालोद्यान निर्माण करण्यात यावे,कामठी शहरातील लीज प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यात यावा. कामठी शहरात विभिन्न सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयाकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालय तयार करण्यात यावे,कामठी शहरातील पत्रकारांसाठी तालुका पत्रकार भवन निर्माण करण्यात यावे,कामठी शहरात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलावंतासाठी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी या प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी करण्यात येत आहे.