
नागपूर:-पेशवाई संपवण्यासाठी 30000 सैनिकांशी लढणाऱ्या महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांना नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. हा अभिवादन कार्यक्रम दक्षिण नागपुरच्या मानेवाडा रोडवरील बालाजी नगरातील त्रिसरण बुद्ध विहार परिसरात असलेल्या भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीस रविवार दि 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वा होईल
बहुजन समाज पार्टीचे प्रदेश, जिल्हा, विधानसभा, सेक्टर स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम व प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

