खापरखेडा :- अंतर्गत ०५ किमी अंतरावर जलदर्शन बार किल्लेकोलार दहेगाव रंगारी येथे फिर्यादी नामे- अशोक रामप्रसाद पासवान, वय ५७ वर्ष, रा. वार्ड नं. ०४ दहेगाव रंगारी याचा मित्र नामे अमरजित सिंगने फिर्यादीला फोन करून सांगितले की फिर्यादीचा मोठा मुलगा मृतक नामे- निखिल पासवान याचे नांदा येथे झगडा भांडण झाले आहे.फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे दोघेही नांदा येथे गेले असता त्या ठिकाणी निखिलचा मित्र अमरजितसिंग, आशिष शास्त्री हे जलदर्शन बार जवळ उभे होते आणि त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते. रस्त्याच्या कडेला निखीलचा मृतदेह पडलेला होता, निखिलच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर आरोपी राहुल राजन सुर्यवंशी, रा. वार्ड नं. ०३ सिल्लेवाड़ा खापरखेडा याने जलदर्शन बार दहेगावजवळ चाकूने वार करून जिवानीशी ठार केले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कॉक्रेटवार हे करीत आहे.
जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com