ध्यान व ज्ञान म्हणजे बुद्ध आणि शिक्षा – ऍड सचिन चांदोरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पोर्णिमेपर्यंत धर्म प्रचार करणाऱ्या भिक्खूनी एकाच ठिकाणी राहावे कारण बुद्धांच्या आदेशानुसार धर्म प्रचार करणाऱ्या या भिक्खूना विशेषतः पावसाळ्यात अनेक संकटाचा सामना करावा लागत होता तेव्हा एकाच ठिकाणी राहून वाचनास धम्माचे पठण ,अध्ययन करावे व परिसरातील उपासक आणि उपसीकेना धम्म शिकवण द्यावी तसेच ध्यान व ज्ञान म्हणजे बुद्ध आणि शिक्षा आहे असे मौलिक प्रतिपादन ऍड सचिन चांदोरकर यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत कामठी येथील जुनी खलाशी लाईन स्थित अनागरिक धम्मपाल बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापन कार्यक्रम प्रसंगी केले.

दरम्यान श्रामनेर भिक्खू संघाच्या पथसंचलनचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर विहारात भन्ते प्रज्ञारखीत तथा भन्ते धम्मबंधु भींमचौक नागपूर द्वारा धम्म वाणी चे पठण करण्यात आले.याप्रसंगी सुगत रामटेके, रजनीताई धोंगडे ,नितीन डोनेकर सह मोठ्या संख्येत उपासक उपसिकागण उपस्थित होते. यानंतर भव्य भोजनदान वितरणाने वर्षावास कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या भोजनदानाचा शेकडो च्या वर उपासकांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र धोगडे, सुरेश गजभिये, आरजु कांबळे, मिथुन चांदोरकर, कुदन चवरे, विशाल माटे, सुनिल गडपायले, रविजय नगरारे, प्रफुल सवाईफुल, गुलाब खोब्रागडे, दिपक डोनेकर, मदन मेश्राम, पकंज रामटेके, प्रमोद रामटेके प्रविण रामटेके, विलास बन्सोड, उदास बन्सोड , लता गणेश सांगोडकर, दिपाली गजभिये, देवांगना गजभिये, प्रज्ञा तांबे, विद्या भिमटे, शेवंता अशोक चांदोरकर, सुधा रंगारी, सीमा रामटेके, अलका तांबे, अमिता चांदोरकर, शारदा कांमळे, अर्पना चांदोरकर, मंजु वांद्रे, स्नेहा चांदोरकर

NewsToday24x7

Next Post

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा 

Wed Nov 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा दिवाळीच्या शुभ पर्वावर कामठी तालुक्यातील कढोली या गावामध्ये पांडव पंचमिला दिनेश ढोले मित्र परिवार व युवक व्यापारी संघ कढोली तर्फे स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज* यांचे जाहीर कीर्तन व नुकत्याच पार पडलेल्या गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचीत सरपंच व ग्रा. पं. सदस्याचा तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com