जिवे ठार मारणाचा प्रयत्न करणाऱ्या पाहिजे आरोपींना अटक

नागपूर :- दिनांक १६.०२.२०२४ चे १७.०० वा. चे सुमारास, फिर्यादी संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा, वय ३१ वर्षे, रा. नाईक तलाव, बांग्लादेश, मराठा चौक, पाचपावली, नागपुर हे त्यांचे मित्राला कोर्टाचे तारखेवर भेटायला गेले होते तेथुन परत जातांना ईतर मित्रासह पोलीस ठाणे सदर हद्दीत, व्हीसिए स्टेडियम समोरील डॉली चाय टपरी समोर, ऊभे असता आरोपी क. १) मंगेश उर्फ मंग्या सुरेश चिरूडकर वय २० वर्ष रा. कांजी हाऊस चौक, इंदीरामाता नगर, यशोधरानगर, नागपूर २) अभिषेक उर्फ घोडा गणेश गांगलवार वय २० वर्ष रा. बाळाभाऊपेठ नाग मंदीर जवळ,पाचपावली, नागपूर यांनी त्याचे ईतर साथिदारासह संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली तसेच फिर्यादीचे पायाचे मागील बाजुस मांडीवर गुप्ती सारखे शस्त्राने मारून जखमी केले, फिर्यादीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे करण्यात आला होता. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे आरोपीविरूध्द कलम ३२६, ५०४, ३४ भा.द.वि., अन्वये गुन्हा दाखल करून त्यांनी आरोपी क. १ व २ यांना अटक केली होती.

व पाहिजे आरोपी साथिदारांचा शोध सुरू होता,

सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान, पोलीस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीवरून व तांत्रिक तपास करून, वर नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारे आरोपी नामे १) हर्ष उर्फ पिंडा सदानंद आनंदपवार, वय २० वर्षे, रा. मराठा चौक, नाईक तलाव, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर २) विवेक उर्फ विक्की उर्फ छोटा आऊ रमेश वाघाडे, वय २३ वर्षे, रा. तांडापेठ, मोचीपूरा, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याचे कबूल केले, सदर गुन्हा हा पोलीस ठाणे सदर येथील असल्याने आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करीता दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे सदर यांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि क. ३) यांचे मार्गदर्शनात, वपोनि बाबुराव राऊत, सपोनि प्रविण सोमवंशी, पोहवा ज्ञानेश्वर भोगे, छगन, नापोभं रमेश मेनेवार, इमरान शेख, पोझं गगन यादव, संतोष शेंद्रे, राहुल चिकटे, महेन्द्र सेलोकर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुक २०२४ संबंधाने, पोलीस ठाणे पारडी पोलीसांचा रूट मार्च व एरीया डॉमीनेशन

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ संबंधाने  पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त,नागपूर शहर व अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग यांचे सुचनांनुसार पोलीस ठाणे पारडी हद्दीत दिनांक ११/०३/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. ते १२.१५ वा. चे दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ चै पूर्व तयारी ने अनुषंगाने निकेतन कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ के. ५, नागपूर शहर यांने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com