रामटेक :- दिनांक २४/०५/२०२३ चे १७.०० वा. ते १७/१५ वा. दरम्यान फिर्यादी ही कॉलेज येथुन सुट्टी झाल्याने बस मध्ये बसुन घरी जायला निघाली होती. त्यानंतर ०५/०० वा. दरम्यान फिर्यादी ही बसमधुन उतरुन आपल्या घरी जात असतांनी एक अनोळखी मुलगा बस स्टॉपवरुन फिर्यादीच्या मागे येतांनी दिसला. फिर्यादी रोडने घरी जात असतांनी एक अनोळखी मुलगा फिर्यादीचे मागुन येवुन त्याने फिर्यादीचा हात पकडला व फिर्यादीस विचारले की “तु कोणत्या शाळेत शिकत आहे. फिर्यादीने त्याचा हात झटकला असता आणखी तो पुन्हा मागे येवुन त्याने फिर्यादीचा हात पकडला व त्याने विचारले की तुला काय झाले असे म्हणून फिर्यादीने आणखी हात झटकून व फिर्यादीचे काही न ऐकता तो फिर्यादीच्या समोरील बँकच्या समोर असलेल्या पानठेल्यात जावुन बसलेला दिसला. त्यानंतर फिर्यादी भितीने आपले घरी गेली व आईला फोन करून झालेल्या घटनेबाबत सांगीतले. त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीची आई शाळेजवळ आली व त्या अनोळखी मुलाला पाहत होती. पण तो अनोळखी मुलगा तेथे दिसला नाही. फिर्यादीला कॉलेज मधुन सुट्टी झाल्याने आपल्या घरी जात असतांनी फिर्यादीचा अनोळखी मुलाने पाठलाग करुन दोनदा फिर्यादीचा हात पकडला व फिर्यादीची छेड काढुन फिर्यादीचा विनयभंग केला..
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३५४ (अ), ३५४ (ड) भा. द.वि. कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. यावले पोस्टे रामटेक या करीत आहे.