कोंढाळी :- १) पो.स्टे. डाळी अंतर्गत मौजा चंदन पार्डी येथे दिनांक २०/०४/२०२३ चे १८/२० पा. मे १९१५ पा. दरम्यान यातील नमुद आरोपी नामे रोशन विठठल गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. चंदनपारडी व आपल्या हातात गंजलेली लोखंडी तलवार घेवुन फिरत होता. सदर इसम हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने गंजलेली लोखंडी तलवार आपल्या हातात देवून फिरत असल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला… सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- सफौ भोजराज तांदुळकर व नं. ५०६ पोस्टे कोंढाळी यांचे रिपोर्टवरून पो. स्टे कोंढाळी येथे आरोपीविरुद्ध कलम ४ २५ आर्म अॅक्ट कायदाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सफौ भोजराज तांदुळकर व नं. ५०६ है करीत आहेत.