नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माण स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना

– जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त प्रत्यक्ष घटणास्थळांवर

– मनपाकडून विविध भागात मदतीसाठी आपात्कालीन मदत क्रमांक जारी

नागपूर :- शुक्रवारी रात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचल्याने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्य सुरु केले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. मनपातर्फे तत्काळ मदतीसाठी आपात्कालीन मदत क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

नागपुरात काल शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अवघ्या ४ तासात १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यानुसार फडणवीस यांनी तातडीने नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्य करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.

तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी शहरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा (एनडीआरएफ) एक आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) दोन चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. फडणवीस सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, मनपाकडून आपात्कालीन मदत क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

आपात्कालीन नियंत्रण कक्ष (मुख्यालय)

0712-2551866/7030972200

लक्ष्मीनगर झोन क्र.1

0712-2245833

धरमपेठ झोन क्र.2

0712-2565589/2567056

हनुमान नगर झोन क्र.3

0712-2755589

धंतोली झोन क्र.4

0712-2958401

नेहरू नगर झोन क्र.5

0712-2270090/2702126

गांधीबाग झोन क्र.6

0712-2735599

सतरंजीपुरा झोन क्र.7

7030577650

लकडगंज झोन क्र.8

0712-2737599/2739020

आशीनगर झोन क्र.9

0712-2653476

मंगळवारी झोन क्र.10

0712-2595599/2590605 / 253690

नागपुरातील बचाव कार्याबाबत महत्वाची माहिती :

नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

-एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.

– एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

– मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

– नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.

– अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.

– शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बचाव-राहत कार्य : उपमुख्यमंत्री चे मानद सचिव सक्रिय

Sat Sep 23 , 2023
नागपुर :- नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) गाठले आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com