गडचिरोली जिल्हयात प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन

गडचिरोली :- सुरक्षा उद्योगांच्या निर्मितीची संभाव्यता आणि कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन आणि खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा,2005 च्या अनुषंगाने, कॅपस्टन फॅसिलिटीज मॅनेजमेंट लिमिटेड हैद्राबाद ही संस्था मॉल व रिटेल, शॉपींग कॉम्प्लेक्स, बँका, खाजगी कार्यालये, उद्योग व कंपन्या, संस्था व शाळ, दवाखाने इ.ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पुरविण्यासाठी विविध राज्यात काम करते.

सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कॅपस्टन फॅसिलिटीज मॅनेजमेंट लिमिटेड या संस्थेत नोकरीची संधी दिली जाईल. वयाच्या 60 वर्षांपर्यंत ESIC, पेंशन, ग्रॅज्युइटी, बोनस, निवास, वार्षिंक वाढ आणि पदोन्नती इ.टी/ए/डीए पगारासह अखिल भारतीय हस्तांतरण सुविधा राज्य सरकारच्या किमान वेतनाच्या नियमानुसार दिल्या जातील (रु.14500/- ते 18500/- 12 तासांसाठी ) इ. सुविधा निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येतील.

सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर साठी 500 पदसंख्या असून गार्ड साठी पात्रता ही 8 वी ते 10 पास/नापास, उंची 165 सेंमी, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. तर सुपरवायझार साठी पात्रता ही पदवीधर आणि NCC, “C” Certificate, उंची 172 सेंमी, 30 ते 35 वर्षे वय आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे यात शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बॅंक पासबुक (मुळ व झेराक्स), पोलीस व्हेरीफीकेशन, पासपोर्ट, MBBS डॉक्टर कडून मेडीकल, फिटनेस प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.

सदर समुपदेशन मेळावा हा केवळ पुरुषांकरिता आहे. वरील पात्रताधारक उमेदवारांनी पुढिल दिनांक निहाय तालूक्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे. भामरागड व एटापल्ली, सिरोंचा व अहेरी येथील मेळावे संपन्न झाले आहेत. चामोर्शी व मुलचेरा मेळाव्याचे ठिकाण पंचायत समिती सभागृह, मुलचेरा येथे दिनांक 25 मे रोजी सकाळी 11.00 ते 3.00, वडसा व आरमेारी मेळाव्याचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वडसा, पंचायत समिती सभागृह, आरमेारी येथे दिनांक 26 मे रोजी सकाळी 11.00 ते 3.00, गडचिरोली व धानोरा मेळाव्याचे ठिकाण पंचायत समिती सभागृह, धानोरा येथे दिनांक 29 मे रोजी सकाळी 11.00 ते 3.00, कोरची व कुरखेडा मेळाव्याचे ठिकाण पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे दिनांक 30 मे रोजी सकाळी 11.00 ते 3.00 वा. आयोजित केले आहे असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

Thu May 25 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणासंदर्भात बुधवारी (ता.२४) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहामध्ये झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!