माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त नेत्र रोग निदान शिबिर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 21 मे ला कामठी शहर कांग्रेस कमिटी, युवक कांग्रेस सेवादल, महिला कांग्रेस व एनएसयुआई च्या वतीने नगर कांग्रेस कमिटी भवन येथे भव्य नेत्र रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात मोफत नेत्र रोग तपासणी करीत 670 जरूरतमंद लाभार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. तसेच 43 डोळ्यांचे जाळे रोगीची मोफत शस्त्रक्रिया करून 76 मोतीयाबिंदू रोगीचे मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचे आश्वासीत करण्यात आले.

स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले व शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.भव्य नेत्र रोग तपासणी शिबीर यशस्वी रित्या पार पडला असून या शिबिरात माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव मो इर्शाद शेख,महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे विद्यमान महासचिव अनुराग भोयर,माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर,माजी नगराध्यक्ष निरज यादव, माजी उपाध्यक्ष शाहीदा कलीम अंसारी,कामठी शहर कांग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव, नरेंद्र शर्मा, माजी नगरसेवक निरज लोणारे, कांग्रेस पदाधिकारी आबिद ताजी, मीर आरीफ अली, मोबिन अहमद,धिरज यादव, आशिष मेश्राम,राजकुमार गेडाम, अरशद क़माल, साजीद कमाल, तुषार दावानी,फैसल नागानी, सलामत अली, मोहम्मद सलमान, साजीद अंसारी,कर्रार हैदर, मजहर हसन‌ हैदरी,संदिप यादव, मनोज यादव, तौसीफ फैजी, हिफ्जुल अंसारी,सोहेल अंजुम, सुल्तान अशरफी,सलाम अंसारी,आकाश भोकरे,फरमान खान,आनंद खोब्रागड़े, प्रकाश लाईन पांडे,नाजिम कुरैशी, राजेश कांबले, ममता कांबले, सुरैया बानो, कुसुम खोबरागड़े,इसरत खांन शमसुननिसा,मंजु मेश्राम, ज्योति कारेमोरे, अंबिका रामटेके,ताहेरा बाजी,परविन बाजी, नजमा परविन,इसरत आरा, राजमणि तालेवार, निकिता मेश्राम, रुक्मिणी,विभा मेश्राम, पुष्पा डोंगरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी नागपुर जिला ग्रामीण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहम्मद राशिद अंसारी व इरफान अहमद यासह कांग्रेसच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका साकारली.

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

Mon May 22 , 2023
नागपूर :– विभागीय आयुक्त कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथीचे वाचन विभागीय उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले. प्रभारी तहसीलदार आर. के.दिघोळे, नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी. व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com