– मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलन पडले महागात!
वाडी :- वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या दालनात सोमवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक प्रश्नावरून वाद निर्माण करीत हिंसक रूप धारण केले व कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून न.प. विरोधात घोषणाबाजी केली होती.या घटनेने न.प.मध्ये एकच खळबळ उडाली होती.
वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते पथकासह घटनास्थळी पोहोचले.सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा केले यात शासकीय कार्यालयाची तोडफोड, बेकायदेशीर आंदोलन, शासकीय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान आदी बाबी निष्पन्न होताच. मुख्याधिकारी विजय देशमुख यांची रीतसर तक्रार नोंदवून वाडी पोलिसांनी आरोपी मनसेचे पदाधिकारी दीपक ठाकरे,राकेश चौधरी,प्रीतम कामपल्लीवार,सोनू गोसावी यांचे वर गुन्हा दाखल करून ३५३,३४, भादवी कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले. मंगळवारी या चौघांनाही न्यायालया समक्ष प्रस्तुत केले असता न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.