सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 78 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (28) रोजी शोध पथकाने 78 प्रकरणांची नोंद करून 50500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 200 रुपयांचा दंड वसुल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून रु 3600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल,सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 15000 दंड वसूल करण्यात आला.या व्यतिरिक्त इतर 19 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 3800 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 8 प्रकरणांमध्ये 8000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 5000 दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NMC-OCW & Green Vigil's World Water Day program at Slum

Wed Mar 29 , 2023
– World Water Week (Day) -2023 Nagpur :- To mark the World Water Day Week celebrations The Nagpur Municipal Corporation, The Orange City Water, and The Green Vigil Foundation organised an engaging and save water awareness programs at Sonegaon slums (Laxmi Nagar Zone), Kachipura Slums (Dharampeth Zone) and Gondpura Slums (Mangalwari Zone) on March 22, 24 & 28 respectively. During […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com