– पत्रपरीषदेत माजी आमदार रेड्डींचे उदगार
– चार गट मिळुन केली ‘ शेतकरी विकास सहकारी पॅनल ‘ ची निर्मीती
– कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत देणार लढा
रामटेक :- येत्या २८ एप्रील ला कृषी उत्पन्न बाजार समितीची आगामी निवडणुक होऊ घातलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसह शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर आपली माणसे समीतीमध्ये पदाधिकारी म्हणुन असायला हवी या उद्देशाने भाजपा चे मल्लीकार्जुन रेड्डी, गज्जु यादव यांचा काँग्रेस गट, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे हरीष उईके व प्रहार चे रमेश कारामोरे यांनी एकत्र येत ‘ शेतकरी विकास सहकारी पॅनल ‘ ची निर्मिती केली व त्यानुसार आगामी कृ.उ.बा.स.च्या निवडणुकीत आम्ही लढा देणार असल्याची काल दि. १८ एप्रील ला झालेल्या पत्रपरिषदेत माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी दिली.
पत्रपरीषदेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपुर्वी रामटेक – तुमसर मार्गावरील खिंडसी येथील एका बैठकस्थळी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, गज्जु यादव, हरीष उईके व रमेश कारामोरे यांची संयुक्त चर्चा बैठक पार पडली. यात कृषी उत्पन्न बाजार समितीसह शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर आपण एकत्रीत येऊन लढा दिला पाहीजे असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार काल दि. १८ एप्रील ला सायं. ६ च्या सुमारास शहरातील दिप हॉटेल येथे एक पत्रपरिषद आयोजीत करण्यात आलेली होती. त्यामध्ये आम्ही चारही गट एकत्र आलो असुन ‘ शेतकरी विकास सहकारी ‘ पॅनल तयार करण्यात आलेले आहे व आगामी कृ.उ.बा. समीतीच्या निवडणुकीत संयुक्तरित्या लढा देणार असुन संपुर्ण अठराही उमेदवारी जागेवर उमेदवार लढविणार असल्याचे यावेळी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी माहिती देतांना सांगीतले. पत्रकार परिषदेला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी कॉग्रेस गटाचे उदयसिंग उर्फ गज्जू यादव, प्रहारचे रमेश कारेमोरे, संजय मुलमुले, राजेश ठाकरे, राहुल किरपान, किशोर रहांगडाले, माजी नगरसेवक आलोक मानकर, नंदकिशोर कोहळे, रणविर यादव, जयेंद्र कांगाली, विनोद दूरुबुळे, सुभाष मानकर, राजेंद्र रेवतकर आणि सर्व स्तरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि बाजार समितीचे अडतीया व्यापारी, हमाल, सरपंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा उद्देश – रेड्डी
आम्ही सत्तेत असतांना कृषी उत्पन्न बाजार समिती चा विविधरित्या विकास केला. शेड बांधले, रस्ता बांधला, वजनकाटा लावला, खस्तावलेल्या कार्यालयाचा प्रस्ताव पुण्याला पाठविला आहे, व्यापारी , शेतकरी अडतीया यांना न्याय द्यायचं आहे. शेतकर्यांना चांगला भाव मिळला पाहिजे या मताचे आम्ही असुन कृ.उ.बा.स.च्या आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाले तर आम्ही विकासाच्या दृष्टीकोनातुन सर्वोतोपरी प्रयत्न करू व तसेच २१ एप्रील अर्ज मागे घेण्याची तारीख असुन त्यानंतर आम्ही आमच्या उमेदवारांचे नाव घोषीत करू असे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रपरीषदेत माहिती देतांना सांगीतले.