मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – कन्हान नदी ही सपुर्ण नागपुर जिल्हयाची जिवन दायनी असुन नदी काठावरील कन्हान शहराला पिण्याच्या पाणी समस्येचा सामना करावा लागतो. येत्या दिवसात व उन्हाळया पाणी समस्या निर्माण होऊ नये, यास्तव नगरसेवक, विरोधी पक्ष गटनेते मनिष भिवगटे हयानी पाणी पुरवठा विभाग अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांची बैठक घेऊन चर्चा, विचार विनिमय करण्यात आले.
गुरूवार (दि.९) फेब्रुवारीला नवीन इमारत नगर परिषद कन्हान येथे चर्चा बैठकीचे आयोजन करून कित्येक दिवसापासुन सुरू असलेल्या पाणी टंचाई परिस्थितीला आळा घालुन शहर वासियांना त्रास होऊ नये म्हणुन पिण्याचे पाणी समस्ये विषया संदर्भात कन्हान नगरपरिषदचे नगरसेवक व विरोधी पक्ष गट नेते मनिष भिवगडे यांनी सर्व पंप ऑपरेटर, पाणी पुरवठा विभाग अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार सोबत चर्चा बैठक घेण्यात आली. कन्हान नदी असुन ही कन्हान शहरात पिण्याच्या पाण्याची भरपुर समस्या असुन दर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा त्रास नगरवासि यांना सहन करावा लागतो. याचे जाणिवपुर्वक मर्म लक्षात घेत पाणी समस्यांचे निवारण कसे करता येईल ? यावर कुठल्या उपायोजना राबविल्या पाहीजे या विषयी चर्चा व विचार विनिमय करून पाण्याचा त्रास होऊ नये, त्या संदर्भात उपाय योजना करण्याचे निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश (बाबु) रंगारी, नगरसेवक विनय यादव, नगरसेविका गुंफाताई तिडके, रेखा टोहने, पुष्पा कावडकर, नगरपरिषद पाणी पुरवठा अधिकारी फिरोज बिसेन, कंत्राटदार धखाते, व्हॉलमन गोपाल नानावे, सुभाष ठवकर, आनंद गजभिये, दिलीप गजभिये, राजेंद्र खोब्रागडे, प्रमिल शेंडे, हरिदास धारगावे, गणेश खांडेकर, रवी मेश्राम, गणपत वंजारी, बाळु गोंडाणे, अरुण शेंडे, पंकज धोटे, चंदु चकोले, धनराज थुटे सह समस्त पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते.