येरखेड्याच्या तरुणाची 15 लक्ष 71 हजार रुपयाने फसवणूक

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 9 :- आजच्या आधुनिक युगात सर्वत्र इंटरनेटचे जाळे पसरले आहे.ज्यामुळे प्रत्येक गोष्ट सहज झाली असली तरी काही गोष्टी ह्या नुकसानदायक ठरत आहेत असाच नुकसानदायक प्रकार उघडकीस आला असून स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यातील एका नामवंत कुटुंबातील तरुणाची 15 लक्ष 71 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.यासंदर्भात फसवणूक झालेल्या फिर्यादी तरुणाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मो क्र 8981311551 चा धारक उमेन्द्रकुमार लदरे विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी फसवणुक झालेल्या तरुणाने गुगल वर शोध घेतल्यानुसार अंधेरी मुंबई येथील मॉगीनिज फूड्स प्रा ली ची फ्रेंचायजी घेण्याचे ठरविले त्यानुसार संबंधितांशी झालेल्या संभाषणातून आरोपी मो क्र 8981311551 चा धारक उमेन्द्रकुमार लदरे च्या फेडरल बँक खात्यावर 15 लक्ष 71 हजार रुपयांची आर्टिजीएस केले .मात्र या फ्रेंचायजी व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्टेशन गाठले असता पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com