कन्हान पेट्रोल पंप वर दोन लुटारूखोरानी शस्त्राचा धाक दाखवुन आठ हजार रूपये लुटुन पसार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान परिसरात भीतीचे वातावरण, पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान : – परिसरात व ग्रामिण भागात दिवसेदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमा णात वाढत असुन नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील चक्रधर पेट्रोल पंप वरून दोन लुटारूखोरांनी देशी कट्टा व चाकुचा धाक दाखवुन नगदी आठ हजार दोनशे वीस रूपये लुटुन पसार झाल्याने परिसरात एकच खळ खब उडुन नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.७) नोव्हेंबर ला रात्री १२.४५ ते १ वाजता दरम्यान अनिल गजानन मस्के वय ४१ वर्ष राह. राजेगाव हा नेहमी प्रमाणे आपल्या कामावर हजर असुन त्याचे सोबत १) सावन वाघधरे वय २२ वर्ष, २) विशाल वानखेडे वय २९ वर्ष, ३) संकेत शेंडे वय २० वर्ष असे चार जन पेट्रोल पंपवर हजर असतांना रोहित यादव वय अंदाजे २२ वर्ष व त्याचा सोबती हे आपल्या युनिकाॅन काळ्या रंगाचा दुचाकी वाहनाने पेट्रोल पंप वर आले. रोहित यादव हा नेहमीच पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी येत असतो व येथील राहणारा असल्याने त्याला अनिल मस्के व त्यांचे साथीदार चांगल्या प्रकारे ओळखत असुन रोहित यादव ने संकेत शेंडे यांचे पाॅईंट वरून आपल्या दुचाकी वाहना मध्ये २०० रूपयाचे पेट्रोल भरायला सांगितल्याने संकेत शेंडे ने त्याचा वाहनात २०० रुपयाचे पेट्रोल भरले व वाहन थोडे समोर थांबवुन रोहित यादव यांनी संकेत शेंडे ला चिल्लर आहे का ? असे विचारले असता संकेत शेंडे यांनी त्याला चिल्लर देण्यासाठी खिश्यातुन धंद्याचे २६०० रू हातात काढले असता रोहित यादव ने जबरीने हिसकावुन घेतले व सावन वाघधरे याला रोहित यादव ने विचारले कि “तुझ्या कडे किती चिल्लर आहे” असे म्हणुन आपल्या सोबत आणलेला देशी कट्टयाचा धाक दाखवुन त्याचे कडुन धंद्याचे ४६२० रूपये हिसकावुन घेतले आणि रोहित यादव च्या सोब ती साथिदाराने अनिल मस्के याला चाकु दाखवुन त्यांचे धंद्याचे १००० रू. असा एकुण ८,२२० रुपये दोन लुटारूखोरांनी शस्त्राचा धाक दाखवुन लुटुन पसार झाल्याने फिर्यादी अनिल मस्के यांचे तक्रारीने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला आरोपी १) रोहित यादव २) रोहित यादव चा साथिदारा विरुद्ध अप क्र. ६४६/२२ कलम ३९२, ३४ भादंवि सहकलम ३,२५ , ४,२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय क पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com