जिल्ह्यात 9 उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

– 57 उमेदवारांकडून 106 अर्जांची उचल

यवतमाळ :- जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, पुसद, उमरखेड या विधानसभा मतदारसंघात आज एकून 9 नामांकन अर्ज दाखल झाले. नामांकनाच्या चौथ्या दिवशी एकून 57 उमेदवारांनी 106 नामांकन अर्जांची उचल केली.

आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून 3 नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात स्नेहल विद्या अरुण रेचे-पाटील (अपक्ष), मनोज महादेवराव गेडाम (अपक्ष), दिलीप वामनराव बेलसरे (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदारसंघात राजु मधुकरराव उंबरकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुसद विधानसभा मतदारसंघात मधुकर राजू राठोड (अपक्ष) यांनी नामांकन भरले.

आर्णी विधानसभा मतदारसंघात नामदेव फकरु सोयाम (अपक्ष), जितेंद्र शिवाजीराव मोघे (भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस) यांनी आज अर्ज दाखल केले. उमरखेड विधानसभा मतदारसंघात संध्या संदेश रणवीर (नॅशनलिस्ट कॅाग्रेस पार्टी शरद पवार व अपक्ष), सदाशिव रामा वाठोरे (इंडियन नॅशनल कॅाग्रेस व अपक्ष) यांनी त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकार रामकिशोर पंवार को न्याय दिलाने आगे आया पवार समाज

Sat Oct 26 , 2024
– मुख्यमंत्री के नाम कलेक्टर और एसपी को सौंपा ज्ञापन, निष्पक्ष जांच कर कार्रवाई की मांग बैतूल :- वरिष्ठ पत्रकार रामकिशोर दयाराम पंवार की छवि धूमिल करने का प्रयास करने वालों पर कार्रवाई की मांग को लेकर पंवार समाज संगठन ने मुख्यमंत्री के नाम कलेक्टर और पुलिस अधीक्षक से शिकायत की है। समाज का आरोप है कि विशेष समाज के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com