विदर्भात सुरु करणार ५०० हनुमान चालीसा केंद्रे – डॉ.मोतीलाल चौधरी

– कन्हान मध्ये एएचपीची जिल्हा बैठक संपन्न 

नागपूर :- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर जिल्हा बैठक ४ ऑगस्ट रोजी कन्हान शहरातील हनुमान मंदिरात पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी, प्रांत मंत्री योगेश गायकवाड, प्रांत मंत्री संतोष ठाकूर, आरबीडीचे प्रांत सरचिटणीस यजेंद्रसिंग ठाकूर, महिला परिषदेच्या प्रांताध्यक्षा अस्मिता भट्ट, प्रांत कोषाध्यक्ष वैभव कपूर, प्रांत मुन्ना ओझा आदी उपस्थित होते.

सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहीद चौक येथील भारत मातेच्या हुतात्मा वीरांच्या स्मृतीस प्रथम पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. नंतर हनुमान मंदिरात भगवान हनुमानजीची व शिवमंदिरात भगवान शंकराची पूजा अर्चना करून तीन वेळा ओंकाराचा जप करून सभेची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कन्हानच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले कन्हान संस्थेचे मीडिया प्रमुख प्रकाश रोकडे यांनी प्रस्ताव मांडला, त्यानंतर जिल्हाध्यक्ष कौस्तुभ आवळेनी बैठकीचे संचालन केले.

अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद् चे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी व सर्व प्रांत व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कन्हानची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली व त्यांना दुपट्टा घालूंन त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. मोतीलाल चौधरी आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेचे नियम, सर्व परिमाणे, उद्दिष्टे आणि पदे ही संस्था सुरळीत चालण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. हिंदुहृदयसम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांच्या सोबत हिंदुत्वाचे कार्य सोबत, राष्ट्रीय सुरक्षा, हिंदू सुरक्षा, सन्मान, समृद्धि, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यावर आम्ही उभे आहोत आणि सदैव उभे राहू, आमचे नेते फक्त डॉ. प्रवीण भाई तोगडिया आहेत, म्हणून त्यांचा आदेश हे आमच्यासाठी सर्व काहि आहे.हे सर्वांना समजावून सांगितले. सहा वर्षात संस्थेचे काय यश आहे, कोरोना च्या कालावधित आम्ही 25 हजार ठिकाणी देशभर्यात भंडारा (भोजनदान) दिले आणि 25 लाख लोकांना मास्कचे वाटप केले. आतापर्यंत देशभरातील 500 जिल्ह्यांमध्ये संघटनेचे काम सुरू झाले आहे, आम्ही परदेशात शुद्धा पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतानमध्ये हिंदुत्व चे काम सुरू केले आहे, आता येत्या एका वर्षात 100 देशांमध्ये काम सुरू करण्याच्या प्रवीण भाईंच्या नियोजनाची माहिती दिली. देशभरात एक लाख हनुमान चालीसा केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट कसे गाठायचे? आणि विदर्भात 500 हनुमान चालीसा केंद्र सुरू करण्याचे नियोजन देऊन संकल्प केले. आणि उपस्थित सहकाऱ्यांना आपापल्या भागात किमान एक हनुमान चालीसा केंद्र सुरू करण्यास सांगितले. राष्ट्रीय बजरंग दलाचे सरचिटणीस यजेंद्र ठाकूर यांनी बजरंग दल कसे कार्य करते हे सांगून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. मुन्ना ओझा यांनीही हिंदुत्व वाचवण्यासाठी आपण काम करण्याची गरज व्यक्त केली. ताई अस्मिता भट्ट यांनी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि समृद्धी, आरोग्य या विषयांवर भाष्य केले आणि महिलांना सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रांतमंत्री संतोष ठाकूर यांनी देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिवारीजींनीही हिंदुत्वाचे महत्त्व सांगितले, कार्यक्रम जवाडपास ७० पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडन्यासाठी नागपुर जिला अध्यक्ष कौस्तुभ आवले, अजय गायकवाड, प्रसाद काठिकर, राजेश भोपुलकर, हिमांशु कोसरकर, रोहित कनोजे, करण नवांगे, कुनालसिंह तिलवार, विवेक उमरकर, रोहित चावरे, दक्ष कुरील, प्रकाश रोकड़े, यालूरे जी अंकुश दुबे,आदि कार्यकर्त्यानी खुप प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ

Tue Aug 6 , 2024
यवतमाळ :- व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी दि.30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यात मुली व मुलांचे प्रत्येकी ९ असे एकूण १८ शासकीय वसतीगृहे कार्यरत आहे. व्यवसायिक पाठ्यक्रमात प्रथम वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com