संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील रणाळा गावात अनधिकृत बांधकाम वाढीवर असल्याने गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून रणाळा गावातील 28 अनधिकृत बांधकाम पाडण्याची कार्यवाही आज 9 जुलै ला पोलीस बंदोबस्तात होणार आहे.या अनधिकृत बांधकामात मोठमोठे लॉन ,हॉल सभागृहाचा समावेश आहे.या कार्यवाहिने मोठमोठे गलेलठ्ठ नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील रणाळा ग्रामपंचायत हद्दीतील 28 अनधिकृत बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 अंतर्गत आज 9 व उद्या 10 जुलै पर्यंत प्रस्तावित अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे.या कार्यवाहीच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम धारकात नैराश्येचे वातावरण पसरले असून रणाळा ग्रामपंचायत प्रशासन विरोधात रोष निर्माण झाला आहे.विकासाच्या नावावर इतके पक्के मोठमोठे बांधकाम पाडण्यात येत आहे तेव्हा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणाळा ग्रामपंचायत ला नगर पंचायत चा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.