महाराष्ट्र शासनाचे अकरा वर्षे मुदतीचे अडीच हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई :- अकरा वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

6 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 7 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी अकरा वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 7 फेब्रुवारी 2035 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल.

अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 7 ऑगस्ट आणि 7 फेब्रुवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रांजल वाघ यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

Thu Feb 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत च्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांच्या वतीने कढोली येथील शांताराम गार्डन येथे मकरसंक्राती निमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी हळदी कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी महिला सक्षमीकरण व महिला स्वरक्षणाची जनजागृती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com