प्रांजल वाघ यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत च्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांच्या वतीने कढोली येथील शांताराम गार्डन येथे मकरसंक्राती निमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी हळदी कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.

या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी महिला सक्षमीकरण व महिला स्वरक्षणाची जनजागृती केली. याप्रसंगी भाजप नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा अमीन,पंचायत समिती सदस्य पूनम माळोदे ,तरोडी ग्रा प च्या सरपंच आरती चिकटे ,कापसी ग्रा प च्या सरपंच तुळसाबाई शेंद्रे ,पवन गावच्या सरपंच नेहा किरण राऊत येरखेड्याच्या माजी सरपंच मंगला कारेर्मोरे, सारिका सहारे ,तानुबाई ठाकरे, शिवनीच्या सरपंच माधुरी कोरडे, अमिता खांडेकर , शारदा मोरेअलका निकाळजे, दुर्गा शहाणे, स्मिता ठाकरे उपस्थित होते.

मेळाव्यात महिलांनी एकल, समूह नृत्य, समूह गाण सादर केले पाहुण्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा वाण व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी केले. संचालन संचालन रोशनी महाले यांनी केले व आभार प्रदर्शन स्मिता ठाकरे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

NewsToday24x7

Next Post

महाकाव्य रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी

Thu Feb 1 , 2024
– रामायणातील एकेक पात्रातून जीवन प्रणालीची ओळख – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई :- भव्य सेट, आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई व डोळ्याचे पारणे फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी अक्षरशः उपस्थितांना मोहिनी घातली. सदर कार्यक्रमाच्या वेळी जय श्री राम या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. ड्रोनच्या माध्यमातून यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. रसिक प्रेक्षकांनी यावेळी केलेल्या जय श्री रामाच्या घोषणांनी आसमंत सुद्धा राममयी भक्तीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com