लग्न तोडल्यावरून तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका अविवाहित खाजगी शिक्षिकेशी लग्न जोडून आगामी 5 मे ला लग्न होणे नियोजित होते.दरम्यान झालेल्या शारीरिक संबंधातून तरुणाने त्या खाजगी शिक्षिकेला 5 लक्ष रुपयांची मागणी केली.यावर शिक्षिकेने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने सदर शिक्षिकेशी होणारे लग्न तोडले यावर पीडित फिर्यादी 31 वर्षीय शिक्षिकेने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भादवी कलम 376 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपिचे नाव अंकित अशोक पाल वय 31 वर्षे रा शिवणी मध्यप्रदेश हल्ली मुक्काम सदर नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी खाजगी शिक्षिका ही खाजगी ट्युशन क्लासेस घेत आहे तर आरोपी एका नामवंत हॉटेल मध्ये वेटर म्हणून कार्यरत आहे.दोघेही वयाधीन असल्यामुळे झालेल्या भेटीगाठी तुन दोघांचे लग्न जुळले व हे लग्न 5 मे ला होणे नियोजित होते .दरम्यान 5 फेब्रुवारी ते 26 मार्च दरम्यान शारीरिक संबंध प्रस्थापित केले व सदर शिक्षिकेला 5 लक्ष रुपयाची मागणी केली.या मागणीला शिक्षिकेने नकार दिल्याने सदर आरोपीने मारझोड करून लग्न तोडले यावर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com