वाघाचा शेतकऱ्यांवर हल्ला शेतकरी जखमी गहेलाटोला येथील घटना

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला चढविल्याने जखमी झाल्याची आज दुपारी दुर्देवी घटना घडली आहे.

जखमी शेतकऱ्यांचे नाव राजेश कांबळे वय 32 वर्षे असुन शेतात धानाची पेरणी करताना अचानक वाघाने शेतीशिवारातच हल्ला चढवला आहे .त्यात डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे.जखमी शेतकऱ्यांला गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती होताच गोरेगाव वनविभागाचे अधिकारी सुरेश रहांगडाले यांनी भेट दिली आहे. या परिसरात वाघाच्या दहशत असल्याने शेतीशिवारात शेतात काम करताना जाताना घटना होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!