सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 148 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (23) रोजी शोध पथकाने 148 प्रकरणांची नोंद करून 68,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 35 प्रकरणांची नोंद करून 14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 19,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा / टाकवू कचरा टाकणे साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 52 प्रकरणांची नोंद करून 10,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 15,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. साकार मल्टी वेन्चर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. आशा बिल्डर्स ॲड डेव्हल्पर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत श्री. किशोर पटेल यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. वाघमारे किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. निरजन किराण स्टोअर्स यांनी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor attends Christmas celebrations at Raj Bhavan

Wed Dec 25 , 2024
Mumbai :-Maharashtra Governor C. P. Radhakrishnan attended the Christmas celebrations in presence of various Church leaders at Raj Bhavan, Mumbai on Tue (24 Dec). The Governor cut the cake and wished everyone a Merry Christmas. Fr. Thomas Joseph from the Nagpur Archdiocese, Fr. Rajesh from the Kalyan Diocese, Fr. Paul Pullen from the Dominican Congregation, along with the sisters and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!