भिवापूर :- दिनांक १५/१०/२०१७ चे ०७ वा. दरम्यान फिर्यादी नामे- अंकुश उर्फ अंगराज श्रीधर सुर्यवंशी वय ३० वर्ष रा. नांदगाव तर्फे नापोशि नरेंद्र पटले व.नं. १२२२ पो.स्टे. भिवापूर यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे.. भिवापूर येथे अप क्र. ९/१५ कलम ३०२, ३०७ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील मृतक नामे- वामन कारूजी पाटिल, वय २५ वर्ष व आरोपी नामे- विशाल तुकडु मेश्राम, वय ३० वर्ष रा. भिवापुर यांचा खर्रा देण्याचे कारणावरून वाद झाले. यातील आरोपीने मृतक यास हातबुक्कीने मारपीट करून डोक्यावर काठीने मारून गंभीर जखमी केले. जखमी हा उपचारा दरम्यान मरण पावला. सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे पो.स्टे. भिवापुर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक १०/०५/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश पावसकर सा. यांनी वरील नमुद आरोपीला सदर गुन्हयात कलम ३०४ भादवि मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व १०, ०००/- रू. दंड, दंड न भरल्यास २ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी खापर्डे यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन सफी./८३१ तुलाराम खडसे पो.स्टे. भिवापूर यांनी मदत केली आहे.