संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारेगाव मार्गे तीनचाकी ऑटो ने गोमास तस्करी होत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ वारेगाव रोड वर सापळा रचून विना परवाना अवैधरित्या गोमांस वाहून नेणाऱ्या ऑटो वर धाड घालून ऑटोमध्ये असलेले तेरा हजार 200 रुपये किमतीचे असलेले 120 किलो गोमांस तसेच तीन सीटर औटो किमती 1 लक्ष 70 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 83 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी ऑटोचालक शेख मोसीफ शेख ख्वाजा वय 32 वर्षे रा शिवनगर नागपूर विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केले असून पुढील तपास सुरू आहे.