स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्र्रवार ता. 26) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्टार सुपर स्पेशालिटी, मुंजे चौक, सिताबर्डी, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव वैद्यकीय कचरा आढळून आल्याने कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध रवि सांभारे, शाहु नगर, मानेवाडा, नागपूर यांच्यावर मोकळया जागेवर जनावरे बांधुन अतिक्रमन केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दुर्वानकर अपार्टमेंट, निवारा सोसायटी, मनिष नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शाम किराणा स्टोर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अरशद ड्राय फुड़स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

आझाद चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत वाहतूक प्रतिबंधित

Fri May 26 , 2023
– १४ नोव्हेंबर पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे आझाद चौक ते लाकडीपूल व मनिपूरा चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता आझाद चौक ते लाकडीपूल व मनिपूरा चौक ते लाकडीपूल आयचित मंदिर पर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com