नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत कश्मीरी गल्ली, कमल चौक, नाकोड़ा इंटरप्राईजेस येथून दोन इनव्हर्टर बॅटरी किमत ३०,०००/- रूच्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी ललीत दिनेश बेताला वय ३६ वर्ष रा छापरी नगर चौक, नीलीशा अपार्टमेंट यांनी दिलेल्या ताक्रारीवरून पो.ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पो. ठाणे पाचपवली चे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून तसेच, तांत्रीक तपास करून गुन्हा करणारे आरोपी हे रात्रीचे वेळेस सफाई कर्मचारी किंवा कचरा वेचणारे असल्याचा बनाव करून चोरी करीत असल्याचे निष्पन्न केले. व गुन्हयातील आरोपी १) गजेन्द्राबाई विजय गोसावी वय ४० वर्षे, २) सविता दिनेश गोसावी वय ३० वर्षे ३) पवित्रा नटवर गोसावी वय ३५ वर्षे, ४) ज्योती जयराम गोसावी वय ३० वर्षे सर्व रा. गायत्री नगर, जगनाडे चौक, गायत्री मंदिर मागे, पो. ठाणे कोतवाली नागपूर, ५) मोहम्मद अनवर खान मो. अख्तर खान वय ३२ वर्षे रा. अस्लमभाई यांचे घरी किरायाने, बरफ फॅक्टरी जवळ, ताजबाग, पो. ठाणे सक्करदरा, नागपूर यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, आरोपींनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीची सखोल विचारपुस केली असता, आरोपींनी पो. ठाणे लकडगंज हद्दीत आजमशाह चौक येथील एका हॉटेल मधुन एल जि कंपनीने तिन ए.सी कॉम्प्रेसर मशीन व भट्टीवरील झाकने असा एकुण ६६,०००/- चा मुद्देमाल चोरून नेल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातून एकूण ०२ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले असुन दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेला अँये क्र. एम. एच. ४९ ए.आर २४८४ असा एकूण २,९६,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त परी क्र. ०३, सपोआ लकडगंज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव जाधव, पोनि गुन्हे महेन्द्र आंभोरे, पोउपनि जितेन्द्र भार्गव, पोहवा, भोगे, नापोअं ईमरान शेख, रोमेश मैनेवार,गगन यादव, संतोष शेन्द्रे, राहुल चिकटे, नितीन लोखंडे, मपोअ शुभांगी वारेकर व चित्रा नंदनवार यांनी केली.