इंडियन स्वच्छता लीग २.० साठी नागपूर संघ सज्ज

नागपूर :- देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देत याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा म्हणून केंद्र शासनाने “इंडियन स्वच्छता लीग २.० या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेचा संघ सज्ज झाला आहे.

‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या नागपूर शहराच्या संघाला “नागपूर टायगर्स” असे नाव देण्यात आले आहे. “नागपूर टायगर्स” या संघाच्या कर्णधारपदी सुरभी जयस्वाल यांची निवड करण्यात आली असून, शहराचे स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर  कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गुरदास राउत, उमेश चित्रीव यामध्ये असणार आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण, विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यटनाला चालना देण्यासाठी 'आयटो'चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल - प्रधान सचिव राधिका रस्तोगी

Thu Sep 14 , 2023
मुंबई :- इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे ३८ व्या ‘आयटो’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीश महाजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com