नागपूर – स्वातंत्र्याच्या या ७५ व्या आझादी अमृत महोत्सव वर्षी स्वातंत्र्य दिना निमित्य एम्बुलेंस ला साईड द्या अशा रॅली चे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे.
रॅलीची सुरुवात भारत मातेच्या व स्वामी विवेकनंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करुन करण्यात आली. रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन अंबाझरी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर व सिताबर्डी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस प्रामुख्याने उपस्तिथ होते. रॅलीची सुरुवात गांधीनगर स्टेकिंग ग्राउंड कडून ते रॅली LAD कॉलेज चौक,अभ्यंकर नगर चौक,माटे चौक,स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी,अंबाझरी गार्डन,कैम्पस चौक, फुटाला बिरसा मुंडा पुतळा चौक,रवीनगर चौक,रामनगर चौक,हिल रोड,शंकर नगर पासुन या रॅली चे समापन गांधीनगर स्टेकिंग ग्राउंड येथे करण्यात आले.
रॅली चा उद्देश होता की कोणत्याही बांधवांच्या कुटुंबातील व्यक्ति एम्बुलेंस मधे असल्यास रस्त्यावरिल होणारी वाहतुक कोंडी झाल्यास काही मिनिटाच्या अभावामुळे जीव गमावावा लागतो. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या करिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी युवा एक शांती एक क्रांती फाऊंडेशन नागपुर च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.