संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तारखेनुसार) ३५१ वा शिव राज्याभिषेक म्हणजे हिंदू साम्राज्य दिन उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे मोठ्या उत्साहात रनाळा चे पोलीस पाटील विशाल आमधरे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामठी चे नगर संघचालक मुकेश चकोले , शिव नित्य पुजन समीती चे संयोजक अनिल गंडाईत, हिंदू जागरण मंच चे चंदन वर्नम ,युवा चेतना मंच चे कोषाध्यक्ष रुपेश चकोले, युवा चेतना मंच चे नागपूर जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष अतुल चोरघडे, माजी संचालक नागपुर जिल्हा मजुर सहकारी संघ चे हितेश बावनकुळे या प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे रूद्राअभिषेक करून विधिवत पूजन करून सामुहिक शिवस्तुती घेण्यात आली व प्रासादाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अल्केश लांजेवार , वरीष्ठ शिक्षक यशपाल गंगराज, दिव्याग फाऊंडेशनचे सचिव बाॅबी महेंद्र, श्रीकांत मुरमारे प्रामुख्याने उपस्थित होते .शिव उत्सव प्रमुख मयुर गुरव ,सहप्रमुख कुणाला सोलंकी, भुषण ढोमणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन युवा चेतना मंच, शिव नित्य पुजन समीती व हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने केले . याप्रसंगी युवा चेतना मंच प्रसिद्ध प्रमुख प्रफुल्ल जी बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रोप व स्वामी विवेकानंद यांची पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून मुकेश चकोले यांनी शिव राज्याभिषेक दिन हिंदू साम्राज्य दिन म्हणून का साजरा केला जातो यावर माहिती दिली.याप्रसंगी प्रा पराग सपाटे, अमोल नागपुरे ,अक्षय खोपे , शेखर घाटोळे, प्रफुल्ल बावनकुळे, आशिष पोटभरे, अनिल शाहु,बादल मदणे, कुणाल रंधई ,मयूर लोंढेकर व समसत युवा चेतना मंच ,शिव नित्य पुजन समीती व हिंदु जागरण मंच चे सदस्य प्रामुख्याने प्रामुख्याने उपस्थित होते.