संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे युवकाने लोखंडी ऐंगल ला दोरी ने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१) आँक्टोंबर ला पहाटे सकाळी ४ वाजता दरम्यान मृतकाचे वडील लाला माधोराव डाफ वय ४८ वर्ष रा. खदान नं.६ इंदर कॉलरी शिव मंदीर जवळ खदान झोपेतुन उठले व परमात्मा एक ची सेवा असल्याने आंघोळी करिता पाणी गरम करण्यासाठी घराचा दरवाजा उघडला असता घराचे सामोर अंगणात त्यांचा मुलगा आकाश लालाजी डाफ वय २४ वर्ष हा घराचे लोखंड़ी लांब असलेल्या ऐंगला पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास लाऊन लटकलेल्या अवस्थेत दिसुन आला.
लाला यांनी लगेच त्याची आई अनिता डाफ ला झोपेतुन उठवुन सांगितले की, आकाशने गळफास लावला आहे. व नंतर जावाई अंकुश घरझाडे आणि इतर नातेवाईकांना फोन केला. घराशेजार लोकांना मदती करिता बोलावुन घटनेची माहिती पोलीसांना दिल्याने पो हवा सतिश फुटाणे व शैलेश वराडे यांनी घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शववि च्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आकाश याचे मृत्यु बाबत वडिल लाला यास कोणावरही कोणत्याच प्रकारचा संशय नसल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी लाला माधोराव डाफ यांचा तक्रारी ने पोस्टे ला कलम १७४ जाफौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पो हवा सतिश फुटाणे आणि शैलेश वराडे हे करित आहे .