नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १८/०६/२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे लकडगंज, शांतीनगर, नंदनवन, राणाप्रतापनगर व यशोधरानगर, नागपूर ने हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रदीप उर्फ चिनी वल्द ध्रुवसिंग थापा, वय ३५ वर्ष, रा. तुळशीनगर, घाट चौक, पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक १८/०६/२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला, त्यास दि. १८/०६/२०२४ रोजी आदेशाची बजावणी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे करून त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
प्रदीप उर्फ चिनी वल्द ध्रुवसिंग थापा, याचेविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज, शांतीनगर, नंदनवन, राणाप्रतापनगर व यशोधरानगर येथे जबरी बोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे, खंडणीकरिता एखादया व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भीती घालणे, खंडणीकरिता एखादया व्यक्तीला मृत्यु किंवा गंभीर दुखापत यांची भीती घालणे, प्राणघात शस्वाने दुखापत करणे, प्राणघातक शस्वाने गंभीर दुखापत करणे, स्त्री चा विनयभंग करण्याच्या उदद्देशाने तिच्यावर हमला करणे, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उददेशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे, गृह-अतिक्रमण करणे, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, घरफोडी करणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, लोकसेवक सार्वजनिक कार्य पार पाडीत असतांना त्याला अटकाव करणे, अश्लील शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याच्या उदद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दारू पीऊन धुमधाम करणे, प्राणघातक शस्व जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२२ व २०२४ मध्ये शांतीनगर पोलीसांकडून कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती, परंतु त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे प्रदीप उर्फ चिनी वल्द ध्रुवसिंग थापा याची याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हे शाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानवध्द करण्याकरीता प्रस्ताव तयार केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेवा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.