संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतून आणि श्री. गजानन शिक्षण सेवा द्वारा संचालित संघर्ष जगण्याचा प्रशिक्षण २०२३ या मोहिमेअंतर्गत महिलांनी नुसतं चूल आणि मूल नव्हे तर, त्यांनी स्वावलंबी व्हावे, त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, स्वतःचे अर्थ स्वतः निर्माण कराव म्हणून महिलांसाठी निःशुल्क शिवण क्लास व ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले. आता पर्यंत १५ बॅचेस या मोहिमेद्वारे संपन्न झाल्या. पैकी नरसाळा व बहादुरा येथील महिलांचे योग्यरित्या प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांना डिप्लोमा वाटप करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष जि.प. नागपूर, प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती म.बा.क. समिती जि.प. नागपूर,निलेश सोनटक्के मुख्याध्यापक सत्य साई विद्या मंदिर, नंदा ठाकरे सचिव श्री गजानन शि.से. संस्था, ऋषभ राऊत प्रबक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समग्र प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
निशुल्क प्रशिक्षण दिल्याबद्दल समग्र प्रशिक्षणार्थी महिलांनी प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांचे आभार व्यक्त केले.