चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित अन् उत्तम भविष्यासाठी सुधीरभाऊंना विजयी करा – सुनील शेट्टी

– सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्या भद्रावती आणि वरोरा येथील रॊड शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद

भद्रावती :- सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य असून, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. भद्रावती येथे आयोजित रोडशो दरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते.

चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो च्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत होते. लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्वल भविष्य ठरविणारी आहे. यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचे असल्यामुळे भद्रावतीच्या जनतेने भविष्याचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनाच मतदान करावे असे आवाहनही सुनील शेट्टी यांनी केले.

या रोड शो मध्ये सुनील शेट्टी यांच्या समवेत विधानसभाप्रमुख रमेश राजूरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, चंद्रकांत गुंडावार, अफजल भाई, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे, सुनील नामोजवार,अंकुश आगलावे, प्रणिता शेंडे, लता भोयर, वंदना सिन्हा, युवराज धानोरकर, पप्पू सारवान, अर्चना आरेकर, इमरान खान, अमित गुंडावार, विशाल ठेंगणे, श्रीपाद भाकरे यांच्यासह भाजपा व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भद्रावती येथील स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून या रोड शोला प्रारंभ झाला तर नाग मंदिरापर्यंत झालेल्या या रोड शो मध्ये सुनील शेट्टी यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांना पंचारतीने ओवाळले तर पुष्पवृष्टी देखील केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाची अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्यास कटिबद्ध - मनपा प्रशासक व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

Sun Apr 14 , 2024
– अग्निशमन सेवा दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन आणि आपात्कालीन विभाग पार पाडतो. केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यास मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com