कामठी तालुक्यात लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती होणार!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी अंतर्गत कामठी,वाडी, उमरेड, रामटेक, मोहपा,कळमेश्वर, काटोल, खापा या ठिकाणी अंगणवाडी केंद्र कार्यरत असून कामठी तालुक्यातील शहरी भागात 115 तर ग्रामीण भागात 155 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत.या अंगणवाडी केंद्रातील रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांची पदभरती राबविण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्या अनुषंगाने कामठी शहरातील काही रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीसासह तालुक्यातील ग्रामीण भागातील 155 अंगणवाडी केंद्रातील 28 अंगणवाडी सेविका मदतनीसांची पदभरती होणार आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागातील 28 रिक्त जागेनुसार 8 सेविका तर 20 मदतनीसांची पदभरती निघणार आहे. त्यामुळे आता तालुक्यातील युवतींना व महिलांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील रिक्त 28 जागेपैकी 20 मदतनीस पदभरती नुसार आजनी केंद्र क्र 1 ,शिरपूर, वरंभा,टेमसना, पांढरकवडा, तरोडी बु,बिडगाव, रणाळा, कवठा, येरखेडा, खसाळा, खैरी,महादूला, कोराडी, लोंणखैरी, जुना नांदा तर सेविकासाठी म्हसाळा, रजा टाऊन, सावळी, आजनी क्र1,उनगाव, भामेवाडा, टेमसना या केंद्रातील जागेचा समावेश आहे.

बालकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पदभर्तीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असेल असे सांगण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी भरती प्रक्रियेबाबत नवीन शासन निर्णय काढला असून या शासन निर्णया नुसार भरती प्रक्रियेचे निकष बद्लवण्यात आले आहेत. आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शैक्षणिक अहर्ता किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.अंगणवाडी सेवीका व मदतनीस यांच्या भरतीसाठी यापूर्वी असलेली वय 21 ते 30 ही वयोमर्यादा 18 ते 35 अशी केली आहे. सेवानिवृत्ती वयामध्ये बदल करण्यात आला असून पूर्वीचे वय 65 वरून आता शासन निर्णयानुसार 60 वर्षे करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेले असून पूर्वी दहाव्या वर्गाला जे जास्तीचे महत्व देण्यात आले होते त्याऐवजी आता बारावी,पदवी,पदवीधर ,डीएड,बीएड आणि एमएससीआयटी यालासुद्धा गुण देण्यात आलेले आहेत. तर उमेदवारांना थेट नियुक्ती दिली जाईल.

महिला व बाल विकास विभागाकडून काढलेल्या शासन निर्णयानुसार तालुक्यात लहान बालकांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी आता सुशिक्षित युवती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील युवतींना अंगणवाडी सेविका व मदतनीस रूपाने रोजगार मिळनार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता युपीआय ॲपद्वारे करा मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा, फोन पे, गुगल पे, वर कर भरण्याचा पर्याय

Wed Feb 15 , 2023
चंद्रपूर :- शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. मालमत्ता – पाणीपट्टी कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात. शहरात ८० हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com