भंडारा जिल्हयाला उदयोगात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार डॉ.प्रशांत पडोळे

– ईग्नाईट कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

भंडारा :- भंडारा जिल्हयात धान,रेशीम साडया, तसेच पितळीचा पारंपरिक उदयोग वाढविण्यासाठी सुक्ष्म ,मध्यम व मोठे उदयोगांना अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केले.

एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी IGINTE MAHARASHTRA-2024″ या अंतर्गत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज नियोजन विभागात करण्यात आले होते. त्यात पडोळे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, तर विशेष अतिथी खासदार डॉ.प्रशांत पडोळे ,सहसंचालक गजेंद्र भारती यांच्यासह मैत्री विभाग, मुंबई, निर्यातीकरिता DGFT नागपूर, भांडवलाकरिता SIDBI/IDBI, तसेच यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

जिल्हयात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठया प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत असणाऱ्या सर्व योजनांची माहिती भारती यांनी दिली.

यावेळी पितळी उदयोगाविषयी उदयोजक पंकज सारडा,तर डिजेएफटीच्या योजनांविषयी स्नेहल ढोके यांनी विस्तृत माहिती दिली.

उदयोगासाठी मुलभुत सोयी सुविधाशिवाय झपाटलेपण ही पाहीजे,त्यासाठी अश्या कार्यशाळांचे आयोजन केले पाहिजे असे श्रीमती आशा पठाण यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला माविमच्या महीला, विविध औदयोगिक संघटनांचे प्रतिनीधी ,उदयोजक व महिला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागासवर्गीय मुला, मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशास मुदतवाढ

Tue Jul 9 , 2024
भंडारा :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून चालु सत्रातील वसतिगृह प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावा. सुधारीत वेळापत्रकानुसार सन 2024-25 सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com