सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 117 प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (17) रोजी शोध पथकाने 117 प्रकरणांची नोंद करून 58800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 7 प्रकरणांची नोंद करून रु 1400 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु 2०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 3 प्रकरणांची नोंद करुन रु 1500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8400 रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 2500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आला.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस इत्यादींना रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 10000 दंड वसूल करण्यात आला.या व्यतिरिक्त इतर 28 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 5600 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 20 प्रकरणांमध्ये 20000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख  वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे  धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी शहरातील माजी सैनिकांनी मालमत्ता करमाफी चा लाभ घ्यावा - प्रदीप भोकरे

Fri Nov 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जिवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे देशाची सेवा करीत देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सम्मान देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयातून बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com